उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू

मुंबईः   उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन यावर्षी २२ दिवसांच असणार आहे. ३ मार्च ते २५ मार्च असा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असणार आहे. ११ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. नंतर प्रलंबित बिल आणि मागण्या यावर पाच दिवस चर्चा होणार आहे. हे अधिवेशन मुंबईत पार पडणार आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ९ मार्च रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून  मिळाली आहे.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची विनंती महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे.

महाविकास आघाडी सरकार आपला तिसरा अर्थसंकल्प यावेळी मांडणार आहे. कोरोनामुळं याआधीचं पावसाळी असो किंवा हिवाळी अधिवेशन त्याचे कामकाज कमी दिवस चालले होते. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी पूर्ण काळ चालावे अशी विरोधकांची अपेक्षा आहे.

Share