मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: संजय राठोड यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मुंबईमधील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मंत्री संजय राठोड यांनी ट्विट करत म्हणले की, आज सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे कोरोना चाचणी केली. व ती पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांनी मला लक्षणे नसल्यामुळे घरीच क्वारंटाईन व्हायला सांगितलेले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना काही त्रास किंवा लक्षणे असेल तर त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती’. असे ट्विट संजय राठोड यांनी केले आहे.
आज सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे कोरोना चाचणी केली.व ती पॉझिटिव्ह आली.डॉक्टरांनी मला लक्षणे नसल्यामुळे घरीच क्वारंटाईन व्हायला सांगितलेले आहे.माझ्या संपर्कात आलेल्याना काही त्रास किंवा लक्षणे असेल तर त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती.
— Sanjay Rathod (@SanjayDRathods) August 27, 2022
दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार असताना संजय राठोड यांना पुजा चव्हाण प्रकरणात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपाने संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. मात्र राज्यात भाजपाचे सरकार येताच शिंदे गटात सामील झालेल्या राठोड यांना मंत्रिपद मिळाले. यावरून विरोधकांकडून सरकारवर टिकेची झोड उठवण्यात येत आहे. राठोड यांचे मंत्रिपद चांगलेच चर्चेत आहे. तर दुसरीकडे आपल्याला पोलिसांनी क्लिन चिट दिल्याचा दावा मंत्री संजय राठोड यांच्याकडून करण्यात आला आहे.