मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या निकटवर्तींयांच्या घरी काल ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. यावरुन आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना केंद्र सरकावर निशाणा साधाला. ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करुन विरोधकांना दाबण्याचा प्रत्यत्न असल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
अनिल देशमुखजी असतील किंवा संजय राऊतजी यांच्या निकटवर्तीयांवर जी कारवाई होत आहे. हे सर्व राजकीय दबाव निर्माण करण्याकरीता सुरु आहे. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. कितीही दबाव निर्माण केला तरी महाराष्ट्र सरकार झुकणार नाही. pic.twitter.com/GNGrg3RCdf
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) February 3, 2022
ईडी, सीबीआय, एनआयए आदी केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवडणुकी आधी शरद पवारांना नोटीस देण्यात आली. तामिळनाडूत निवडणूक असताना डीएमके नेत्याच्या घरी छापेमारी सुरू झाली. उत्तर प्रदेशातही हेच उद्योग सुरू आहेत. महाराष्ट्रात कितीही दबाव निर्माण केला तरी हे सरकार झुकत नाही हे दिसून आल्यावर सरकारातील लोकांना अडचणीत आणण्यासाठी भाजप वेगवेगळे डाव करत आहे. अनिल देशमुख असतील किंवा संजय राऊतांच्या निकटवर्तीयांवरील कारवाया असतील… हे सर्व राजकीय दबावासाठी सुरू आहे. सत्तेचा कितीही दुरुपयोग केला तरी राज्यातील आघाडीतील एकही नेता या दबावाला घाबरणार नाही. या देशात ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे ते पाच राज्याच्या निवडणुकीतून समोर येईलच. हा प्रकार अधिक काळ सुरू राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.