माँ-बाप मत निकालिए’ सुप्रिया सुळेंचं केंद्रीय मंत्र्यांना प्रत्युत्तर

दिल्ली : राष्ट्रवादी काॅँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘ द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून संसदेत कश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून चांगल्याच आक्रमक पाहायला मिळाल्या.त्यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना देखील सुनावलं आहे.

सुप्रिया सुळे बोलताना म्बणाल्या की, पहिल्या सरकारने ६० वर्षांत काय केलं हा डायलॉग जुना झाला, केवळ कलम ३७० काढल्याने काश्मिरी नागरिकांच्या आयुष्यात बदल घडत नाही. २०२२-२३च्या अर्थसंकल्पात भाजप सरकारने काश्मिरी पंडितांसाठी काय तरतूद केली?’ असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. जम्मू-काश्मिरमधल्या शिक्षणव्यवस्थेबद्दल भाष्य केल्यानंतर त्यांच्यात आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यात वाद झाला. वादा नंतर ‘तुमच्या आई-वडिलांमुळेच तुम्ही इथवर पोहोचले आहात’ असं विधान जितेंद्र सिंह यांनी केलं. यावर ‘डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झालेला तुम्हाला चालतो, मग आमच्याबद्दल तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? फादर – मदर को छोड के कुछ भी बोल सकते है,माँ-बाप मत निकालिए’ असं सुप्रिया सुळेंनी लोकसभेत जितेंद्र सिंह यांना म्हंटल आहे.

Share