स्वाभिमानीचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची संघटनेतून हकालपट्टी

अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी याबाबत काल घोषणा केली. .मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे स्वाभिमान शेतकरी संघटनेने भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.

आ. देवेंद्र भुयार यांनी माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला होता आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार म्हणून ते निवडून आले. दरम्यान आ. भुयार यांनी मंत्रिपदासाठी राजू शेट्टी यांच्याकडे आग्रह धरला. मात्र मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक दिवसांपासून पक्षाच्या पहिल्या फळीतील नेते आणि देवेंद्र भुयार यांच्यामध्ये खटके उडत होते.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, देवेद्र भुयारबद्दल माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. तुम्ही शेतकऱ्यांचा घात केला असेल तर अशी घाण आमच्या संघटनेत राहू शकत नाही. आजपासून देवेंद्र भुयारचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संबंध नाही. त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी घोषणाही शेट्टी यांनी यावेळी केली.

Share