यांना दाऊदने सुपारी दिलीय वाटतय राऊतांचे भाजपवर आरोप

मुंबई- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुरुवारी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर नवा पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला. मुंबईचे माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करतानाच त्याचा पुरावा म्हणून फडणवीसांनी इसाक बागवान यांचे बंधू नासीर बागवान यांचं एक स्टिंग ऑपरेशन पेनड्राईव्हमध्ये असल्याचा दावा केला. यावरून राज्यात खळबळ उडाली असतानाच शिवसेनेचे खासदार  संजय राऊतांनी भाजपावर आणि फडणवीसांवरच उलट आरोप केले आहेत.

राऊत पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, कोणाचाही घरात घुसु नका तसेच इसाक बागवान यांना महाराष्ट्र ओळखतो. तुम्ही कुणावरही काहीही आरोप करून पोलीस दलाचं मनोबल खच्ची करू नका. त्यांच नुकतच पुस्तक आलं आहे. त्यांनी ईस्त्रायली नागरिकाला जीवाची बाजी लावून वाचवलं होत. त्यानंतर त्यांचा सत्कार देखील करण्यात आलां. त्यामुळे भाजपने संरक्षण विभागाचं खच्चीकरण करु नये असं राऊत यांनी म्हंटल आहे.

दरम्यान , भाजप सध्या अल-कायद्याच्या अजेंड्यावर चालत आहे. त्यामुळे मला वाटत की,यांना दाऊदनेच सुपारी दिली आहे असं वाटत आहे. अल कायदाचा अजेंडाच हा होता. काही राजकीय लोकांना हाताशी धरायचं, त्यांना सुपारी द्यायची आणि देशाचं, राज्याचं प्रशासन, व्यवस्था याला सुरुंग लावायचा हा अल कायदाचा अजेंडा होता.

Share