देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा दरात पुन्हा वाढ, जाणु घ्या पेट्रोल डिझेलचे दर

नवी दिल्ली : काल एका दिवसाच्या विश्रांती नंतर आज पुन्हा एकदा तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत ९७.८१ रुपये आणि डिझेलची किंमत ८९.०७ रुपये झाली आहे. तर मुंबईत पेट्रोलची किंमत ११२.५१ रुपये तर डिझेलची किंमत ९६.७० रुपये झाली आहे. गेल्या चार दिवसांत देशात तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. यापूर्वी २२ आणि २३ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर ८०-८० पैशांनी वाढले होते.

दरम्यान  देशात ४ नोव्हेंबर २०२१ पासून ते २१ मार्च २०२२ पर्यंत पेट्रोले आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. पण या दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली. या काळात कच्चा तेलाची किंमत ही ८२ डाॅलरवरून ती १११ डाॅलरवर पोहोचली आहे. त्यामुळे या तीन कंपन्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पाच महिन्यांनंतर २२ आणि २१३ मार्चला देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

मूडीजने आपल्या अहवालात सांगितलं आहे की, बाजारातील सध्याची स्थिती पाहता पेट्रोलियम वितरण कंपन्यांना पेट्रोलच्या विक्रीवर दररोज २५ डॉलर प्रति बॅरेल आणि डिझेलच्या किंमतीवर २४डॉलर प्रतिबॅरेल नुकसान होत आहे.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMS च्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.

Share