yuval noah harari And Faulty AI TUTARI…!!

स्थिरता, हा स्वभाव प्राण्यांचा नाही, तसा तो मनुष्यप्राण्याचा पण नाही. जग आर्टीफिशीयल इंटलिजन्सच्या प्रभावीखाली जात आहे.…

दरवर्षी वारी, वारका-यांची माऊलीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठीची ओढ. ठिकठिकाणी रिंगण, चंद्रभागेत स्नान, नगरप्रदक्षिणा, एकादशीचे कळस दर्शन, व्दादशी करायची आण परतायचं, परत संसाररुपी मोहमायेत. याच वारीत येणाऱ्या चार शहराच्या लोकसंख्ये एवढा वावर जगात कुठेच अनुभवयांस येत नाही. या वारी निमित्त शासनस्तरावर खुप मोठ्या प्रमाणावर बैठका, आढावे, नवनवीन प्रयोग, न्यायालयाच्या विविध आदेशांचे पालन, याची भाऊ गर्दी झालेली असते. याच भाऊ गर्दीत खुपसे चेहरे अर्थअर्जानासाठी या शहरात प्रवेशतात. यांचा प्रवेश सोहळ्याच्या आठ दिवस अगोदर हळुवार शहरात होतो. मोक्याच्या जागा हेरण्याचा कार्यक्रम पार पडतो. यांच्यातील अर्धी जनता पालखी ज्या ज्या ठिकाणी मुक्कामाला असते त्या त्या ठिकाणी पालखी सोबत असते. एक अख्ख विक्रेत्यांचे शहर या पालखीसोबत असते. त्यांच्या व्यापारासाठी कुठलीही सोय, सुविधा शासन देत नाही. कारण या व्यापाऱापासून शासनाचे उत्पन्न ते काय असणार.

वारीतल्या या व्यापारामुळे शासनाच्या व्यवस्थापन करणाऱ्या विविध आस्थापनांवर ताण येतोच. ट्रॅफीक, नगरपालिका कचरा संकलन, कायदा व सुव्यवस्था, आरोग्य यंत्रणा, सुरक्षा यंत्रणांवर देखील  तो त्रास असतोच. आता स्थानिक व्यापा-यांनी देखील या व्यापा-यांना जागा देत वारेमाप भाडे आकारणी करीत, वारी काळातील व्यापार तुटीची भर काढूण घेण्याचा प्रयत्न चालवीला आहे, तो वेगळा. या आतबट्याच्या व्यवहाराची नोंद कुठेच होत नसते. माऊलींच्या व तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत हे व्यापारी देखील वारीचा अनुभव घेत घेत पुढे सरकतात.

शासनाने लाडकी बहीण,भाऊ, दाजी, वहिनी ज्या काही योजना आहेत, त्या मोठ्या शितीफीने या वारी कार्यक्रमात जाहीर करीत सवंग लोकप्रियतेचा लाभ उचलण्याचा प्रयत्न, गत दोन तीन वारीत अनुभवयास आला. यात असल्या व्यापा-यांसाठी शासनाने दखल घेतली असती, तर निश्चितच हा व्यापार थोडाबहूत प्रमाणात नोंदणीकृत झाला असता. परंतू नियोजनाचे वावडे असलेल्या पांढरपेशा नोैकरशाहीला व याच थिंकटॅँक वर बसून चंद्रभागेत बुडकी मारणाऱ्या राजकीय नेतृत्वाला त्याची गरज नाही. किंबाहूना ते या व्यापा-यांना पण नकोय.

वारीत तिन पत्ते, झन्नामन्ना साऱख्या झटपट पैसे घालविण्याचा उदयोग करणा-यांचा सुळसुळाट देखील होता. बहूतेक त्यांना वरदहस्त असल्याकारणाने, ते निर्लज्जासारखे पंढरपुर शहराच्या चहू बाजूने ,त्यांचा खेळ चालवित होते येणाऱ्या भोळ्या भाबड्या वारकऱ्यांना लुटत होते. शहरात आलेले पोलीस पथक हे राज्याच्या विविध भागातून आलेल. ते फक्त स्वतःची राहण्याची, दर्शनाची व्यवस्था कशी होईल यात मग्न. अपवाद होता चंद्रभागेच्या वाळवंटातील सोलापूर पोलीस पथक आणि त्यांची QRT च पथक. अष्टमी ते एकादश सतत डोळ्यात तेल घालून हे पथक त्यांच्या सोबत आरोग्य पथक गस्त घालीत होतं. महसूल विभाग, नगरपालीका प्रशासन हे साथीला होतेच. परंतू यात समन्वयाचा अभाव या वेळेस जागोजागी जाणवत होता. मंदीर प्रशासनाचा स्वतःचा सुभेदारी तोरा (यावर सविस्तर वृत्तांकन लवकरच होईल) यामुळे प्रत्येक वेळी आपली माणंस कशी जपली जातील यातच, पोलीस, स्थानिक, मंदीर  प्रशासन मग्न असल्याचे प्रकर्षाने जाणविले.

माऊली सर्व सांभाळून घेते,हे तक्रारखोरांना दिल जात असलेले उत्तर, भावनेच्या आहेरी जात तक्रारखोर देखील ऐकत होते. परंतू हि पळवाटच. मंत्रालीयन कर्मचाऱ्यांची प्रत्येक ठिकाणी दादागिरी. त्यातल्या त्यात मुख्यमंत्री कक्ष प्रथम, मग गृहविभाग, मग महसूल आणि मग इतर असा भेदभाव या ठिकाणी जाणवत होता. त्यात खासदार आमदार, वेगवेगळ्या कमेटींचे सदस्य, वारकरी संप्रदायातील वेगवेगळे किर्तनकार, आम्ही जुने, नवीन या वादासह यात होतीच. माऊली भेदभाव मिटविण्यासाठी कमरेवर हात धरुन उभी असताना देखील, बिनधास्त या ठिकाणी समानतेला हरताळ फासनारी जनता दिसत होती. बिचारा चालत येणारा वारकरी पांडूरंगाला न भेटता कळसाच दर्शन घेवून माघारी परतत होता.

या वारीत एक चेहरा मात्र सतत दिसून येत होता. तो म्हणजे वय वर्ष ५ पासून १२ ते १३ वर्षांच्या मुलांना शहरात विविध ठिकाणी सर्वांगाला पांढरे वार्निश लावून गांधीजीच्या पेहराव्यात उभ केल गेलं होतं. या मुलांच्या मागे पुढे त्यांचे टोळीवाले लक्ष ठेवूण होतीच. त्यांच्या हातात एक प्लास्टिकच बकेट देऊन त्यात भिक मागण्यासाठी उभ केलेेल, पंढरपुरच्या प्रत्येक चौकाने अनुभवंल. या वार्निश चा त्यांच्या त्वचेवर परिणाम होतोय का नाही, त्यांच वार्निश च्या हाताने ती खात पित होती, ते वार्निश पोटात जात आहे, आणि त्याचा दुष्परिणाम काय होणार ? याचं १५ लाख वारकरी आली याचं कौतुकाने सांगणाऱ्या कुठल्याच जमातीला सोयर सुतंक नव्हतं. हा बालकामगार कायदा, भिकारी निर्मुलण कायद्याचा माऊलीच्या सोहळया निमित्त विनयतेने भंग ठरत नाही का ? महिला व बाल कामगार संबंधीचे सचिव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंतच्या अधिका-यांना हे दिसत नसेल का ?  शहर स्वच्छता करण्यासाठी, वारक-यांच्या सेवेत विविध सेवा पुरविणारी अशासकीय संस्थाचे पिक या काळात पंढरपुरात जोमाने आलेले असते. त्यांना हि बालके तणावग्रस्त दिसत नाहीत का ? अन्नछत्र, अगणित पालख्या, आणि त्या अगणित पालख्यांना अध्यात्मारुपी भागवत, किर्तन, भजन करीत मार्गदर्शन करणाऱ्या संतांना/ किर्तनकारांना हे दिसत नसेल का ? न्यायालयाला जसा चंद्रभागेचा घाट महत्वाचा वाटतो, व त्या ठिकाणी अप्रिय घटना घडल्यास जिल्हाधिकारी यांना वैयक्तिक जबाबदार धराव वाटतं, तसं या लेकरांबाबत का वाटत नसावं.? इकडील भागात एक BOSS नावची जमात देखील उदयास आल्याच अनुभवयास आलं. त्या जमातीला देखील याच काही सोयर सुतक नाही. स्थानिक पत्रकार देखील वेगवेगळ्या गटात वाटली गेली आहेत. मंदीर ट्रस्ट कडुन काय काढता येत यात मग्न असलेल्या पत्रकारबांधवांना देखील हा विषय तितका महत्वाचा वाटणार नाही.

पंढरपुरातील आध्यात्मिक गांधी

पाऊसा पासून वाचण्यासाठी मा. मंत्री महोदयांनी मोठ मोठाल्या छत्र्यांचे वाटप त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत इमाने इतबारे केलं. मोठमोठ्या प्लास्टिक निर्मात्या कंपन्यांनी त्यांचे रेनकोट, स्वतःच्या कंपनीचे मार्केटींग व्हावे या करीता पोलीस विभागाला फ्री मध्ये वाटले, एका मुंबई स्थित बापूंचे सेवेकरी वारकऱ्यांसाठी झटले, परंतू या मुलांसाठी मात्र कोणालाच झटावे वाटले नाही. बर अशा मुलांची संख्या ती किती हातावर मोजण्या इतकीच. बर यांच्या सोबतच्या टोळीनी पाकीट प्लेयरी पासून, शंख, रुद्राक्ष, तुळशी माळेच्या दुकानांची सर्वत्र लावलेली असतात. ती सर्व विक्रते अतिशय अस्वच्छ, भाषा गलिच्छ, अप्रिय वर्तण करणारी अशीच. यांच्या सुधारणे वर काम करण्यासाठी एखादीही सामाजिक संस्था  पुढे येऊ  का शकत नसेल.  चंद्रभागेच्याकाठी हरितगृह निर्माण करण्याची चढाओढ लागलेली असते. त्या टॉयलेट बाथरुमचा वारकरी किती वापर करतात हा एक संशोधनाचा वेगळा विषय ठरु शकतो. पण या बालकांचे व त्यांच्या टोळीचे मनपरिवर्तन करीत, यांच्या शिक्षणाच्या सोयी करत प्रवाहात आणन्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. या प्रकारच्या प्रवृत्ती नष्ट झाल्यास, कुठल्याच संस्कृतीचा रास होणार नाही, हे मा.मुख्यमंत्री व त्यांच्या अधिनस्त असलेल्या यंत्रणेला या ठिकाणी नमुद करावंस वाटत. विषय छोटा आहे, पण त्या लेकरांचे आयुष्यासाठी तो खुप मोठा आहे. त्याकडे गांभीर्याने पाहिलं गेल तरच माऊलीची वारी सार्थ ठरु शकेल.अनुदानांची खैऱात लाडक्या जनतेला वाटणाऱ्या शासनकर्त्यांनी या लेकरांचा लाड करावा. त्यांना देखील याप्रकारच्या उदर्निर्वाहातून बाहेर पडण्यासाठी उत्साही बनवाव. माऊली निश्चितच येणाऱ्या निवडणूकीत आणि आध्यात्मिक रुपात उभा केलेले गाँधी लाडकी खुर्ची आशिर्वादरुपी देतीलच.