तामिळनाडूत ‘या’ तारखेला संपूर्ण लाॅकडाऊन-मुख्यमंत्री

तामिळनाडू-  देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असताना. महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. देशातील काही राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच तामिळनाडू राज्यात २३ जानेवारीला संपूर्ण लाॅकडाऊनची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी याबाबात माहिती दिली असून राज्यात रविवारी संपूर्ण लाॅकडाऊन करण्यात येणार असल्याच त्यांनी सांगितलं.

 

तमिळनाडूमध्ये आज २८५६१ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर चेन्नईमध्ये ७५२० रूग्ण नोंदवली गेली आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याच त्यांनी म्हंटल आहे. त्याच बरोबर यंदाच्या लाटेत तमिळनाडू देशातील लाॅकडाऊन करणारे पहिले राज्य ठरणार आहे.

Share