माधव पिटले/ लातूर : कोणतीही महसूली कारवाई न करता अवैध वाळू वाहतूक सुरु ठेवण्यास परवानगी देण्याकरता दीड लाखांची लाच मागणाऱ्या लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्याचे तहसीलदारास लातूर लाचलुचपत विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.
तहसीलदार गणेश जाधव याने आपल्या एजंटच्या मदतीने तक्रारदार दाराकडून वाळूच्या तीन ट्रक नियमितपणे चालवू देण्यासाठी आणि वाळूच्या ट्रकवर या पुढे कारवाई न करण्यासाठी पैसे मागितले होते. यासाठी प्रती ट्रक ३०,०००/- रूपये प्रमाणे दोन ट्रकचे ६०,०००/- रूपये प्रति महिने असा व्यवहार ठरला होता. तीन महिन्याचे १,८०,०००/- रूपये झाले होते. प्रत्यक्ष लाच मागणी करून तडजोडी अंती १,५०,००० रुपयांवर ठरलं होतं.
त्यानंतर या तहसीलदाराने एजंट रमेश मोगेरगे याच्याकडे पैसे देण्याचे सांगितले होते. त्या प्रमाणे तक्रादाराने रमेश मोगेरगे याना निलंगा येथे तहसीलदाराच्या घरासमोर बोलावले. तिथे १,५०,०००/- रूपयांची रक्कम देत असताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहाथ अटक केली. त्यानंतर तहसीलदार गणेश जाधवला अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस सुरू आहे.