मुंबईः राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु आहेत. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे परीक्षा ऑनलाईन घ्याव्या की ऑफलाईन यावर मागील काही दिवसांपूर्वी संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी परीक्षा नियमीत मुल्यमापन पद्धतीने ऑफलाईन होणार असल्याचे सांगितले आहे. उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक २१ डिसेंबर २०२१ ला जाहीर करण्यात आले आहे.
४ मार्च २०२२ ते ७ एप्रिल २०२२ या दरम्यान बारावीची लेखी परीक्षा होणार आहे. तर १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ यादरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे. दोन्ही परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरच म्हणजेच, ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत.
कोरोना महामारीमुळे २५ टक्केंचा अभ्यास याआधीच कपात करण्यात आला आहे. उर्वरितअभ्यासक्रमावर आधारित प्रश्नच परीक्षेत विचारले जातील, असे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले होते. अखेर दहावी-बारवी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
दहावीच्या परिक्षेचं वेळापत्रक
१५ मार्च- प्रथम भाषा
१६ मार्च- द्वितीय वा तृतीय भाषा
२१ मार्च- हिंदी
२२ मार्च- संस्कृत, उर्दू, गुजराती आणि इतर द्वितीय आणि तृतीय भाषा
२४ मार्च- गणित भाग-१
२६ मार्च- गणित भाग-२
२८ मार्च- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १
३० मार्च- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २
१ एप्रिल- सामाजिक शास्त्र पेपर १
४ एप्रिल- सामाजिक शास्त्र पेपर २
बारावीच्या परिक्षेचं वेळापत्रक
४ मार्च – इंग्रजी
५ मार्च – हिंदी
७ मार्च – मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू ,पंजाबी ,तामिळ
८ मार्च – संस्कृत
१० मार्च – फिजिक्स
१२ मार्च – केमिस्ट्री
१४ मार्च – माथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स
१७ मार्च – बायोलॉजी
१९ मार्च – जियोलॉजी
९ मार्च- ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट
११ मार्च – सेक्रेटरीयल प्रॅक्टिस
१२ मार्च – राज्यशास्त्र
१२ मार्च – अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर १
१४ मार्च – अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर २
१९ मार्च – अर्थशास्त्र
२१ मार्च – बुक किपिंग अँड अकाउंटन्सी
२३ मार्च – बँकिंग पेपर – १
२५ मार्च – बँकिंग पेपर – २
२६ मार्च – भूगोल
२८ मार्च – इतिहास
३० मार्च – समाजशास्त्र