ठाकरे गटाचे संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बुधवारी दिवसभरात राऊतांना धमकीचे दोन फोन आले. फोनवरून राऊतांना जीवे मारण्याची धमकी  दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा उफाळून आला आहे. या प्रश्नावरून राज्यात ब्लेमगेम सुरू आहे. कालच या मुद्द्यावर समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. कर्नाटक प्रश्न योग्य न हाताळल्याची टीका सातत्याने शिंदे फडणवीस करणारे संजय राऊत यांनी शांत राहण्याचा इशाराही देसाईंनी दिला. पुन्हा जेलमध्ये जायची वेळ येईल, अशा शब्दांत देसाईंनी सुनावल्यानंतर दोघांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

Share