मायदेशी परतल्यावर विद्यार्थांनी मानले आभार

मुंबईः  सध्या रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तिथे भितीदायक स्थिती निर्माण झाली आहे. अशातच भारतील अनक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. दरम्यान, आनंदाची बातमी म्हणजे काल २१९ आणि आज सकाळी २५० विद्यार्थी मायदेशी परत आण्यात आले आहे. एअर इंडियाचे AI – १९४४ हे विशेष विमान (बुखारेस्ट- मुंबई) युक्रेनमध्ये अडकलेल्या २१९ भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप घेऊन काल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास दाखल झाले. तर आज सकाळी २५० विद्यार्थी रोमानियाहून सुखरुप भारतात परतले. दिल्ली विमानतळावर सकाळी त्यांचे स्वागत करण्यात आले. एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाने हे २५० विद्यार्थी भारतात आणले आहेत.

यावेळी विमानतळावर, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह विविध लोकप्रतिनीधी यांनी युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावास व राज्य शासनाचे मानले आभार मानले. विद्यार्थ्यांना आपापल्या राज्यात पाठविण्यासाठी मदत करण्यात येत होती. मुंबईत परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुणे, यवतमाळ, नागपुर, मुंबई अशा विविध भागातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. मुंबईत सुखरूप परतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून पहायला मिळाला. या विद्यार्थ्यांनी युक्रेनच्या युद्धजन्य परिस्थितीतून मायदेशी सुखरुप पोहोचवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्य शासनाने केलेल्या मदतीबद्दल अभार व्यक्त केले.

*मायदेशी परतल्यावर विद्यार्थांनी मानले आभार*
युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने सर्वत्र अत्यंत भीतीदायक व दहशतीचे वातावरण आहे. मात्र युक्रेनमधील भारतीय दूतावासाने केलेली मदत व महाराष्ट्र शासनाची भक्कम साथ व संपर्कासाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे काल आम्ही मुंबईत सुखरूप परतलो आहोत, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया नागपूर येथील विद्यार्थी गौरव बावणे यांनी दिली.

 

Share