पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे. त्याची तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ होणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च दरम्यान होणार असून १४ ते ३ मार्च तोंडी परीक्षा होईल अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
शाळेतच असणार परीक्षा केंद्र
कोविड असल्याने यावर्षी शाळा तिथं परीक्षा केंद्र असेल. आपल्याच शाळेत मुलांना परीक्षा देता येईल. १५पेक्षा अधिक परीक्षार्थी असलेल्या शाळांना उपकेंद्र मिळेल तर १५ पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांना जवळचे परीक्षा केंद्र मिळेल अशी माहितीही शिक्षण मंडळाने दिली आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वाढीव वेळ
पेपर साडे दहा वाजता सुरू होईल. परीक्षार्थींना अर्धा तास वाढीव वेळ मिळेल. १००मार्कांसाठी ३०मिनिटांचा तर ४०मार्कांसाठी १५मिनिटांचा जादा वेळ मिळेल. यावर्षी आम्ही १५दिवस उशिराने परीक्षा घेतोय त्यामुळे मुलांच्या मागणीनुसार आम्ही आधीच कालावधी वाढून दिला आहे.