दहावीच्या निकालाची तारीख ठरली; उद्याच लागणार निकाल

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून, २०२२ रोजी दु. १ वा. ऑनलाईन जाहीर होईल. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत दिली आहे.

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थी पालकांना होती. अखेर विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाची तारीख जाहीर केली. आपण केलेल्या अभ्यासाला फळ मिळणार आहे, यश मिळणार आहे. यासाठी सर्व विद्यार्थी आणि पालकांना वर्षा गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी १ नंतर उपलब्ध होतील.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ :

http://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

असा चेक करा निकाल

इयत्ता १० वीचा महाराष्ट्र SSC निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी सुरुवातीला www.mahresult.nic.in या महाराष्ट्र बोर्डाच्या निकाल पोर्टलच्या अधिकृत वेबपेजला भेट द्या.

SSC परीक्षेसाठी MSBSHSE निकालासाठी अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर SSC परीक्षेचा निकाल हा पर्याय येईल ज्यावर विद्यार्थ्यांना पुढील वेब पेजवर भेट देण्यासाठी क्लिक करा.

यानंतर आईचे नाव आणि रोल नंबर ही महत्त्वाची क्रेडेन्शियल्स टाकण्यास विसरू नका. विद्यार्थ्यांना दोन्ही आवश्यक क्रेडेन्शियल्स भरावे लागतील आणि नंतर View Result पर्यायावर क्लिक करा. तुमचा निकाल तुमच्या समोर असेल. पुढील रेफरन्ससाठी निकाल डाउनलोड किंवा सेव्ह करून ठेवा.

 

Share