कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिका निडणुकीच्या तोंडावर भाजपला शिवसेनेकडून धक्का देणे सुरुच आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भाजपचे माजी नगरसेवक विशाल पावशे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशाल पावशेसह आत्तापर्यत भाजपचे चार मोठे नगरसेवक शिवसेनेत गेले आहेत. याचे श्रेय खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले जात आहे. आगामी काळात भाजपचे आणखी काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहेत. मात्र हे सर्व होत असताना कल्याण डोंबिवलीतील भाजपचे मोठे नेते असून या नगरसेवकांना थांबविण्याचा प्रयत्न का केला जात नाही, हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
#कल्याण येथील भाजपा चे माजी नगरसेवक विशाल पावशे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधून घेत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यासमयी शिवसेनेत स्वागत करून पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी खासदार @DrSEShinde उपस्थित होते. pic.twitter.com/RTtxOAlWLD
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 9, 2022
याआधी भाजपातून शिवसेनेत तीन नगरसेवकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे. महेश पाटील , सायली विचारे आणि सुनीता पाटीला यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत सेनेत प्रवेश केला होता. त्यातच आता भाजपाचे नगरसेवक विशाल पावशे यांनी राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.