हरियाणा, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये ‘द कश्मिर फाईल्स’ कर मुक्त, मुख्यमंत्र्यांची घोषणा

दिल्ली-  विवेक अग्निहोत्री निर्मीत ” द कश्मीर फाइल्स ” चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारी आहे. चित्रपट पाहिल्यानंतर बहुतेक प्रेक्षक खूप भावूक होत आहेत. हरियाणा सरकारने यापूर्वीच ‘द काश्मीर फाइल्स’ करमुक्त केले आहे आणि आता हा चित्रपट गुजरात आणि मध्य प्रदेश सरकारने सुध्दा करमुक्त केला आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे,  ‘द काश्मीर फाइल्स -‘ जी मध्य प्रदेशातही करमुक्त झाली आहे . हरियाणा आणि गुजरातसोबतच आता मध्य प्रदेश सरकारने काश्मीर फाइल्सलाही करमुक्त केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली आहे.
 बाॅलिवूडमध्ये काश्मीरवर आतापर्यंत अनेक चित्रपट बनले आहेत, पण काश्मीरचा अत्यंत संवेदनशील मुद्दा एखाद्या दिग्दर्शकाने मांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. काश्मिरी पंडितांच्या मनात वर्षानुवर्षे टोचणारी गोष्ट आता या चित्रपटातून समोर आली आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि त्यांना घरापासून वंचित झाल्याची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी काश्मीरी पंडितांना स्वतःचे घर सोडून पळून जाण्यास कसे भाग पाडले हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.त्यामुळे या चित्रपटाने जगा समोर एक सत्यता मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या चित्रपटातील कालाकार देखील नावाजलेले आहेत. 
Share