मुंबईः राज्यातील सुपर मॉल आणि किराणा दुकानात वाईन विक्रीस परवानगी दिली आहे. त्याला भाजपने कडाडून विरोध केला आहे, तर आघाडीने मात्र त्याचे समर्थन केले आहे. यावर आता राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सर्वात जास्त दारू पिणारे लोकं हे भाजपात आहेत, अशी जोरदार टिका केली.
महाराष्ट्र में नई शराब नीति पर नवाब मलिक ने कहा – 'BJP चाहती है ये बंद हो जाए तो BJP के नेता जो शराब का उत्पादन करते हैं, जिनके बार हैं, वे अपना लाइसेंस सरेंडर करें और शपथ ले कि वे आजीवन शराब नहीं पियेंगे'@nawabmalikncp | #NCP | #ZeeSalaamTweet | pic.twitter.com/J3IEBE9lQm
— Zee Salaam (@zeesalaamtweet) February 2, 2022
वाइनविक्री संदर्भात गेल्या आठवड्यात सरकारने निर्णय घेतला आहे आणि भाजपा याला विरोध करत आहे. मध्य प्रदेश, गोवा, हिमाचल प्रदेश सरकारने असाच निर्णय घेतला होता की नाही हे भाजपने सांगावं. वाइनला विरोध होत आहे. भाजपा त्यांच्या नेत्यांचे दारू बनवण्याचे परवाने परत करणार का हा आमचा प्रश्न आहे. अनेक नेते मद्य बनवत आहेत, अनेकांची तर वानची आणि मद्य विक्रीची दुकाने आहेत. सर्वात जास्त दारू पिणारे लोकं हे भाजपात आहेत. त्यांची एक नेता म्हणत थोडी थोडी प्यायला सांगत आहे. भाजपा नेते त्यांचे परवाने परत कधी करणार आणि आजपासून दारू पिणार नाही अशी शपथ कधी घेणार ते त्यांनी सांगावे, असे नवाब मलिक म्हणाले.