दंगल पेटविणारे उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राम्हण असतात; सुजात आंबेडकरांचे वादग्रस्त विधान

औरंगाबाद : वंचित बहूजन आघाडीचे नेते तथा प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात असे सुजात आंबेडकर म्हणाले आहे. औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या बाबरी मस्जिदची दंगल असो किंवा भीमा कोरेगावची दंगल असो, आपण हेच बघितले की दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय ब्राह्मण असतात. त्यांच्या वक्तव्यानंतर प्रवाहित होऊन दंगलीमध्ये जे उतरतात, प्रत्यक्षात ते बहूजन मुलं असतात असे सुजात आंबेडकर म्हणाले आहेत. तसेच राज ठाकरेंना माझे एवढंच म्हणणे होते की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहूजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवावे,” असेही सुजात म्हणाले आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानावर कश्याप्रकारे राजकीय वादळ येणार हे बघणे गरजेचे आहे.

Share