नागराजच्या झूंड चित्रपटाच ‘लफडा झाला’ हे गाण प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबईः दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा हिंदी चित्रपट झुंड येत्या ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच दुसर गाण आज रिलिज झाल आहे. लफडा झाला’ असे या गाण्याचे बोल आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गीत लिहिले आहे. अजय-अतुल यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. तर अजय गोगावले यांनी हे गाण गायल आहे. या गाण्याला चांगलीच पसंती मिळताना दिसतेय. तीन तासात या गाण्याला दोन लाखांहून जास्त लोकांनी पाहिले आहे.

अमिताभ बच्चन यांनी झुंडच्या दुसऱ्या गाण्या बदल पोस्ट  शेअर करत त्यांनी हटके कॅप्शन लिहिले की, ‘इनकी करतूतों पे कभी नहीं लगता ताला, कोशिश करोंगे तो समझ लेना लफडा झाला.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

https://www.instagram.com/p/CaHwLJ3hf9E/?utm_source=ig_web_copy_link

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला ‘झुंड’ हा चित्रपट येत्या ४ मार्चला रिलीज होणार आहे. या चित्रपटाच नव गाण आज रिलिज झाल आहे. ‘लफडा झाला’, असे या गाण्याचे बोल आहे. हे गाण नागराज यांच्याच सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यापेक्षाही भारी असल्याचे बोलल जातय.

चित्रपटाची कथा
हा सिनेमा झोपडपट्टीत राहणारी मुल आणि त्यांचे क्रीडा प्रशिक्षक यांच्यावर बेतलेला आहे. अमिताभ बच्चन हे क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे. सत्यकथेवर आधारित हा सिनेमा आहे. नागराज मंजुळे यांना या सिनेमाची कथा लिहिण्यासाठी दोन वर्षांचा वेळ लागला. या चित्रपटाची कथा लिहिताना अमिताभ बच्चन यांना डोळ्यासमोर ठेवून या सिनेमातील प्रशिक्षकाचे पात्र नागराज मंजुळे यांनी लिहिले आणि आता स्वत: अमिताभ बच्चन यांनी साकारलेले विजय बारसे हे पात्र घेऊन सिनेमा ४ मार्चला प्रदर्शित होतोय. हा सिनेमा विजय बारसे आणि त्यांचे शिष्य यांच्यावर आधारित आहे.

 

Share