लाव रे तो व्हिडीओ! विनायक राऊतांचा नारायण राणेंवर हल्लाबोल

मुंबईः  राज्यातील महाविकास आघाडी आणि शिवसेनेमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत जाताना दिसतो.  दोन्ही पक्षातील नेत्यांनी आतापर्यंत एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. यातच आता नारायण राणे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार टिका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देत लाव रे तो व्हिडिओ म्हणत विनायक राऊतांनी पत्रकार परिषदेत नारायण राणेंवर आरोप केलेत.

नारायण राणेंनी सत्तेसाठी लाचारी पत्करली असा आरोप करत विनायक राऊतांनी राणेंवर निशाणा साधलाय यातला एक व्हिडिओ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यांनी त्यात राणेंची कुंडली माडल्याचा दावा राऊतांनी केला. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सध्या महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारे भाजपनेते किरीट सोमय्या यांनी यापूर्वी राणेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

 

नारायण राणेंकडून केंद्राय मंत्रीपदाचा दुरपयोग करण्यात आला आहे, यंत्रणांचा केंद्रीय सरकारकडून गैरवापर करण्यात येत असून राणे स्व:ताचा भूतकाळ विसरले का? श्रीधर नाईकांच्या खुनातील आरोपी कोण होते? असा सवाल राऊतांनी केला. राणेंचे आरोप दखल घेण्यासारखे नाही. राणेंनीा भ्रष्टाचाराचे आरोप करणे हेच सिंधुदुर्गातल्या जुन्या राजकीय हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गृहमंत्र्यांना सांगणार असे राऊत म्हणाले.

भाजप गुंडांचा पक्ष आहे. अंकुश राणेंचे काय झाले आणि तुम्ही सांगता भाजप गुंडांचा पक्ष? सिंधुदुर्गात कुणाचे काय काय सुरू आहे, हे जर मी सांगितले तर तुमच्या लक्षात येईल, पण मी त्या खोलात जाणार नाही. जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्यांवर दगडफेक करू नये, अशा इशारही त्यांनी यावेळी दिला.

Share