राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवत आहे – संंजय राऊत

मुंबई : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे कौतुक केले. राज्यात नवं सरकार स्थापन झालं तेव्हा मी तुरुंगात होतो. पण देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले काही निर्णय नक्कीच चांगले आहेत. आम्ही विरोधाला विरोध करणारे अजिबात नाही. राज्यातलं सरकार तेच चालवत आहेत आणि त्यांची लवकरच भेट घेणार आहे, असं संजय राऊत म्हणाले. राऊतांच्या या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

खासदार संजय राऊत म्हणाले की, राज्यातील राजकीय कटुता संपवली पाहिजे अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली त्याचं मी स्वागत करतो. राज्यात नवं सरकार आल्यानंतर फडणवीसांनी काही निर्णय नक्कीच चांगले घेतले आहेत. विरोधाला विरोध आम्ही करणार नाही. राज्याचा कारभार उपमुख्यमंत्रीच चालवात आहेत. महत्वाचे निर्णय तेच घेत आहेत. म्हाडाचे अधिकार आम्ही काढले होते ते फडणवीसांनी पुन्हा बहाल केले असे काही निर्णय कौतुकास्पद आहेत. त्यामुळे कामानिमित्त पुढच्या काही दिवसात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.

Share