रवींद्र जाडेजाची बायको गुजरात विधानसभेची निवडणूक लढवणार

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे. जामनगर उत्तर मतदारसंघातून रिवाबा यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.

भारतीय जनता पक्षाने गुरुवारी आगामी गुजरात निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे घाटलोडिया मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मोरबीचे माजी आमदार कांतीलाल अमृत्या ज्यांनी पूल कोसळल्यानंतर लोकांना वाचवण्यासाठी नदीत उडी मारली होती, त्यांनाही भाजपने उमेदवारी जाहीर केलीये.

संभाव्य उमेदवारांमध्ये सामील होण्यासाठी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांच्यासोबत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी झालेल्या बैठकीनंतर ही यादी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर प्रमुख नेते पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीला उपस्थित होते.

Share