उत्तरप्रदेशचा शपथविधी ‘या’ तारखेला पार पडणार,मोदी -शहांचीही उपस्थिती

उत्तरप्रदेश-  उत्तर प्रदेशमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता राज्यामध्ये सत्तास्थापनाच्या घडामोडींना वेग आल्याच दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवणारे योगी आदित्यनाथ होळीच्या आधी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ  घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

योगी आदित्यनाथ हे उत्तरप्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री आहेत जे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित राहणार असल्याचे म्हंटले जात आहे. तसेच देशातील भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. योगी 15 मार्च पर्यंत शपथविधी कार्यक्रम पार पाडणार असल्याचे सुत्रांकडून समजत आहे.

भाजपाने पाचपैकी चार राज्यात लक्षणीय कामगिरी करत सर्व ठिकाणी बहूमत मिळवले आहे. तसेच देशाच्या राजकारणात महत्वाचं स्थान असलेले उत्तरप्रदेशात भाजपाने दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे दिल्ली मैं मोदी ,य़ूपी मैं योगी, ही म्हण सार्थ ठरली आहे.

Share