…तर पोलीस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील – जितेंद्र आव्हाड

ठाणे : काही दिवसांपूर्वीच मुंब्रा येथे एका उड्डाणपूलाचे लोकार्पण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे ही उपस्थित होते. यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर ते गर्दीतून वाट काढत असतना महिलेला हात लावल्याप्रकरणी त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज पुन्हा एकदा  ठाण्यातील एका कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड पुन्हा एका व्यासपीठावर असणार आहेत. पण आव्हाड यांनी यांनी खोचक ट्विट करत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं म्हटलंय.

जितेंद्र आव्हाड आपल्या ट्वीट मध्ये म्हणतात, आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहेत. महापालिकेने मला या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले आहे, पण ब्रिजच्या उद्घाटनात त्यांच्या ८ फूट अंतरावर माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल झाला. ते स्वतः साक्षीदार आहेत.

आज त्यांच्या बाजुला उभा राहीन आणि पोलीस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील. त्यापेक्षा कार्यक्रमाला न गेलेलं बरं. परत पोलीस म्हणतील दबाव होता आणि मुख्यमंत्री म्हणतील तुला माहीत आहे ना मी हे करू शकत नाही. तुला कसं कळत नाही. खरंच कळत नाही. चलो ये वक्त भी गुजर जायेगा”, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

Share