हिवाळा सुरु झाला की बाजारात गाजरांची आवाक वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे घराघरांमध्ये गाजरापासून अनेक विविध पदार्थ तयार केले जातात. यात गाजराची कोशिंबीर, गाजराचे लोणचे, गाजराचा हलवा किंवा गाजराचे पराठे. चवीला गोडसर असलेल्या गाजरापासून केलेला कोणताही पदार्थ हा रुचकरच लागतो. गाजर खाण्याचे खरे तर अनेक फायदे आहेत. त्यामुळे खासकरुन हिवाळ्यात बाजारामध्ये गाजरे दिसू लागल्यावर त्याचा आहारात नक्कीच समावेश केला पाहिजे.
गाजर खाण्याचे फायदे
- गाजराने पचनशक्ती सुधारते. गाजरात बिटा कॅरेटिन असते. ते कॅन्सरला प्रतिबंधक ठरते.
- गाजर कच्चे खावे. त्याने जास्त फायदा होतो. गाजरामुळे वजन वाढत नाही त्यामुळे तुम्ही रोज एक गाजर बिनधास्त खाऊ शकता.
- गाजरापेक्षा गाजराच्या पानांमध्ये लोह असते. त्याने अॅनिमिया दूर होतो.
- थंडीत गाजराचे सेवन केल्याने शरीरात उब राहते.
- गाजराचा रस आणि मध एकत्र करून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- गाजरांच्या पानांची भाजी तयार केली जाते. ती बनल्यावर उरलेले पाणी पाऊन घ्या. त्यात पोषकद्रव्य असतात.
- पालक आणि गाजराचा रस एकत्र करून प्यायल्यास तब्येत सुधारते.
- गाजरात अ जीवनसत्व असते. रोज एक गाजर खाल्ल्याने चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते. तसंच डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
- गाजरात कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी, ए असते. त्याने हृदयरोगावरही मात करता येते.
- थंडीत गाजराचे सेवन केल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे शक्ती टिकून राहते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो.
- याशिवाय तुम्ही घरामध्ये गाजराचे विविध पदार्थ तयार करून खाऊ शकता. मात्र रोज एक कच्च गाजर खाल्ल्यानं त्याचा शरीराला जास्त फायदा होतो.