‘हे’ ६ धोकादायक अ‍ॅप्स, तुमच्या फोनमध्ये असल्यास त्वरित करा डिलीट

नवी दिल्ली : टेक कंपनी गुगलने आपल्या प्ले स्टोरवरून ६ अ‍ॅप्सला हटवले आहे. या अ‍ॅप्सद्वारे फोनमध्ये व्हायरसचा शिरकाव होत होता. या सर्व अ‍ॅप्समध्ये Sharkbot bank steale मॅलवेयर होता. हा मॅलवेयर लोकांच्या बँकेची माहिती चोरी करतो. रिपोर्टनुसार, या मॅलवेयर असलेल्या अ‍ॅप्सला १५ हजारांपेक्षा अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले होते. मात्र, आता गुगलने या सर्व अ‍ॅप्सला प्ले स्टोरवरून हटवले आहे. त्यामुळे तुमच्या फोनमध्ये हे अ‍ॅप्स असल्यास त्वरित डिलीट करा. रिपोर्टनुसार, हे सर्व अ‍ॅप्स जिओफेसिंग फीचरद्वारे (लोकेशन) यूजर्सला ट्रॅक करत होते. ट्रॅक केल्यानंतर यूजर लॉग इन करत असलेल्या सर्व वेबसाइट आणि अ‍ॅप्सचा डेटा जमा करत असे. यूजर्सद्वारे साइटवर लॉग इन केलेला डेटा हे अ‍ॅप्स स्टोर करतात. यामध्ये लॉग इन आयडी आणि पासवर्डचा समावेश आहे. या अ‍ॅप्सचा इटली आण ब्रिटनमध्ये सर्वाधिक वापर केला जात असे.

सिक्योरिटी रिसर्च कंपनी Check Point ने आपल्या ब्लॉगमध्ये या अ‍ॅप्सची माहिती दिली आहे. या सर्व अ‍ॅप्समध्ये Sharkbot मॅलवेयर होता. हा यूजर्सच्या फोनमध्ये “droppers” अ‍ॅप डाउनलोड करत असे व याद्वारे यूजर्सची खासगी माहिती चोरी केली जात होती. या अ‍ॅप्सला Zbynek Adamcik, Adelmio Pagnotto आणि Bingo Like Inc सारख्या कंपन्यांना डेव्हलप केले होते. गुगलने प्ले स्टोरवरून या अ‍ॅप्सला डिलीट केले असले तरीही अनेक थर्ड पार्टी स्टोरवर हे अ‍ॅप्स अद्याप उपलब्ध आहेत.

Sharkbot मॅलवेयर यूजर्सकडून SMS, डाउनलोडिंग जावा कोड, इंस्टॉलेशन फाइल, अपडेटिंग लोकल डेटाबेस, अनइंस्टॉलिंग अ‍ॅप, कॉन्टेक्ट, बॅटरी ऑप्टिमाइजेशन सारख्या २२ वेगवेगळ्या परमिशन घेत असे.

play store वरून हटवलेल्या ऑप्स मध्ये Atom clean-booster, Antivirus , Antivirus super cleaner, Alpha antivirus cleaner, powerful cleaner antivirus, center security antivirus चा समावेश आहे. यातील कोणत्याही अ‍ॅपचा तुम्ही वापर करत असाल तर त्वरित डिलीट करा. कारण, यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होण्याची शक्यता आहे. तुमचा खासगी डेटा चोरी करून हॅकर्सद्वारे बँक खात्यातील पैसे काढले जातात. त्यामुळे फोनमध्ये हे अ‍ॅप्स असल्यास त्वरित डिलीट करा.

 

 

 

Share