लिची खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

लिचीत बीटा कॅरोटीन आणि ओलीग्रोनोल असते...

लिची खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

लिची हे मधुर, रसाळ आणि उन्हाळ्यात जिभेला शीतलता देणारे फळ. हे देखील फळ मूळचे दक्षिण चीनमधले. बाहेरील कवच गुलाबी रंगाचे तर आतील गर मात्र पांढरे रसाळ, मधुर व अर्धपारदर्शी. या फळांमध्ये कार्बोहाईड्रेट, व्हिटॉमिन ए, व्हिटॉमिन सी, बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, कल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फॉरस, आयर्न आणि मिनरल्स यांसारखे पोषक घटक असल्याने शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते.

मात्र याचे अतिरिक्त सेवन करणे टाळा. मे ते ऑक्टोबर ह्या दरम्यान लीची बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. भारतात बिहार व पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक लागवड केली जाते. पाहूयात लीची खाण्याचे काय फायदे आहेत.कोणी खावे ?लीची हे शक्तिवर्धक, रक्ताभिसरण वाढवणारे, रक्ताशी निगडीत असलेले विकार काढून टाकणारे फळ आहे. त्यातील रासायनिक गुणधर्मामुळे पचनक्रियासंवर्धक तसेच निद्रानाशमुक्त करणारे आहे. भारतात लीचीच्या ‘बी’पासून बनवलेला चहा वेदनाशामक म्हणून उपयोगात आणला जातो.

ह्या फळामध्ये पोटॅशियम व तांबे ही खनिजे जास्त प्रमाणत असल्याने हृदयविकार तसेच यकृताच्या आजारावर गुणकारी आहे. या फळाला त्वचेचा खास दोस्त मानला जातो, ते त्यातील ओलीगोनॉल रसायनामुळे. या रसायनामुळे सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.लिचीत बीटा कॅरोटीन आणि ओलीग्रोनोल असते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य राखले जाण्यास मदत होते. हृदयासंबंधित समस्या असलेल्यानांनी आहारात लिचीचा समावेश अवश्य करावा. वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी लिचीचा आहारात जरुर समावेश करा. सकाळच्या वेळेस लिची खाल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि भूक कमी लागते.कोणी खाऊ नये?लीची हे फळ गोड असल्याने मधुमेहींनी टाळावे .


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.