खलिस्तानी समर्थकांकडून धोका ; राम रहिमला झेड प्लस सुरक्षा

दिल्ली-   डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम यांना आता झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. राम रहिम फर्लोवर सध्या तुरुंगाबाहेर आहे. सूत्रांच्या माहितीनूसार, राम रहीमच्या जीवाला खलिस्तानी समर्थकांकडून धोका आहे.त्यामुळे हरियाणा सरकराने राम रहिमला सुरक्षा पुरवण्यात येणार असल्याचं उच्च न्यायालयात म्हंटल आहे. साध्वी लैंगिक शोषण आणि हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राम रहीम सध्या फर्लोवर आहेत.

उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमधून अशीही माहिती समोर आली होती  डेरा प्रमुख गुरमीत राम रहिमला खलिस्तानी समर्थकांचा धोका आहे. यामुळे हरयाणा सरकारने तुरुंगातून फर्लोवर बाहेर असलेल्या राम रहिमला झेड प्लस सुरक्षा दिली आहे. महाधिवक्त्यांकडून कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर राम रहिमला झेड प्लस सुरक्षा देण्यासाठी हालचाल सुरु करण्यात आली होती.

 

Share