राज कुंद्रा केस: मुंबई पोलिसांकडून आणखी चौघांना अटक

मुंबई- राज कुंद्रा पाॅर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघड केले असून त्यात बिझनेसमनचा देखील समावेश आहे. वर्सोवा आणि बोरिवली परिसरातून एक कास्टिंग डायरेक्टर आणि इतर तिघांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. गेल्या वर्षी, राज कुंद्रा या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून नाव समोर आले होते आणि त्याने जवळपास तीन महिने कोठडीत घालवले होते. सप्टेंबरमध्ये तो जामिनावर बाहेर पडला होता.

दरम्यान, राजच्या मुंबईतील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आणि  चित्रपटांच्या निर्मिती आणि वितरणात गुंतला होता. लैंगिक व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल बिझनेसमनवर महिलांचे असभ्य प्रतिनिधीत्व प्रतिबंध कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यामुळे पोलिसांनी अटक केलेल्या लोकांमुळे राज कुंद्राच्या अडचणीत वाढ होईल का असा सवाल निर्माण होत आहे.

Share