हिजाब बंदीवर निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींना जीवे मारण्याची धमकी

कर्नाटक-  शाळा महाविद्यालयात हिजाब परिधान करण्यावर बंदी घालण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाला कायम ठेवण्याचा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. मात्र हा निकाल देणाऱ्या त्रिसदस्यीय खंडपीठामधील सदस्य तथा कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रितुराज अवस्थी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रितुराज अवस्थी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अॅड. उमापती एस यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार उमापती यांनी न्यायमूर्तींना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर आल्याचे सांगितले. या व्हिडीओमध्ये झारखंडमधील न्यायाधीशांच्या खुनाचा संदर्भ देत , पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेल्यानंतर या न्यायाधीशांचा खून करण्यात आला होता. अगदी अशाच पद्धतीने कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अवस्थी यांचा खून करण्याची धमकी या व्हिडीओव्दारे देण्यात आली आहे, असे तक्रारदारने म्हंटले आहे.

दरम्यान या घटनेमुळे न्यायमुर्तींना वाय प्लस सुरक्षा पुरवणयाचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री बोम्मई यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत.

 

Share