श्रीलंकेत सर्व शालेय परीक्षा रद्द ! जाणून घ्या या मागचं कारण

आंतरराष्ट्रीय- श्रीलंकेने लाखो शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. कोलंबोमध्ये प्रिंटिंग पेपर संपुष्टात आल्याने आणि नवीन पेपरच्या आयातीसाठी निधी नसल्याने हा निर्णय घेण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.

शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारपासून एका आठवड्यात नियोजित चाचणी परीक्षा, पेपरच्या तीव्र तुटवड्यामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शाळेतील मुख्याध्यापक मुलांची चाचणी परीक्षा घेऊ शकत नाहीत, कारण प्रिंटिंगसाठी लागणारा कागद आणि शाई आयात करण्यासाठी निधी नाही, असं पश्चिम प्रांताच्या शिक्षण विभागाने सांगितले. या निर्णयामुळे देशातील ४५ लाख विद्यार्थ्यांपैकी सुमारे दोन तृतीयांश विद्यार्थ्यांच्या परीक्षेला फटका बसणार आहे.

अत्यावश्यक आयातीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी परकीय चलनाच्या साठ्याच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत अन्न, इंधन आणि औषधांची कमतरता जाणवू लागली आहे. श्रीलंका सध्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशाची परकीय चलनाची गंगाजळी जवळपास रिकामी झाली असून चीनसह अनेक देशांच्या कर्जाखाली श्रीलंका दिवाळखोरीच्या मार्गावर आहे.

Share