जिल्ह्यात आजपासून पर्यटन स्थळे सुरु

औरंगाबाद- जिल्ह्यातील पर्यटन स्थळ आजपासून सुरु करण्या निर्यण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. पर्यटनस्थळे खुली होणार असली तरी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हंटले आहे.

जगप्रसिध्द वेरूळ , अंजिठा लेणी, बीबी का मकबरा , पानचक्की, दौलताबाद किल्ला, औरंगाबाद लेणी हि पर्यटन स्थळे आजपासून पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यासोबतच उद्याने , मैदाने, पार्क नियमित वेळेत सुरु करण्यात आली आहेत. रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत निर्बंध लागू असणार आहेत.

दरम्यान लग्नसमारंभात आता २०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे . तर अंत्यविधीसाठी उपस्थितांसाठी कोणतेही निर्बंध नसणार आहेत.तसेच नाट्यगृह ,सांस्कृतिक कार्यक्रम यावर ५० टक्के उपस्थिती निर्बंध कायम आहेत . हा निर्णय काल झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बैठकीत घेण्यात आले.

Share