कार्तिक आर्यनचा चर्चेत असलेला चित्रपट ‘भुल भूलैया २’ ची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यन मंजुलिका नावाच्या भुतासोबत पंगा घेताना दिसला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन हा चित्रपट हॉरर कॉमेडीपट असू शकतो, ३ मिनिट १६ सेकंडच्या या ट्रेलरची सुरुआत ‘सॉन्ग आमी जे तोमार’ या गाण्याने होते ज्यामुळे एक भीतीदायक माहोल
चित्रपटात बघायला मिळतो

त्यानंतर मंजुलिकाची एंट्री होते ती जवळपास १५ वर्षानंतर परत येते, या चित्रपटात कार्तिक आर्यन मंजुलिकाला कैद करताना दिसणार आहे
त्यासोबतच या ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी यांचा लव अॅंगल ही दाखवला आहे
