उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल; शिक्षणमंत्र्यांची माहिती

मुंबई : बारावीच्या निकालाची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पहात असतात. कोरोनानंतर बारावीच्या झालेल्या परिक्षांमुळे यंदाच्या निकालाची सगळेच उत्सुकतेने वाट पाहातायत. अशात आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीच्या निकालाची तारखी जाहीर केली आहे. ७ जून उद्या दुपारी १ वाजता निकाल लागणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्र्यांची ट्विट करुन माहिती दिली आहे.

वर्षा गायकवाड यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून ट्विटरवरून ही घोषणा केली आहे. त्या म्हणाल्या की, “महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(१२वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१ वा. ऑनलाईन जाहीर होईल.”

या वेबसाईटवर पाहता येईल निकाल

mahresult.nic.in

mahahsscboard.in

hscresult.mkcl.org

दरम्यान यावर्षी विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा दिल्या. कोरोना काळात लिखाणाचा सराव सुटल्याने त्यांना परीक्षेकरिता अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. तसेच काही प्रमाणात अभ्यासक्रमातदेखील कपात करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्ष करोनामुळे ऑनलाइन अभ्यास करावा लागला होता. वर्षाच्या अखेरीस काहीच काळ विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊ लागले होते. त्यामुळे या निकालाची उत्सुकता कायम आहे.

Share