मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गोरेगावमधील पत्राचाळ गृहप्रकल्पातील नागरिकांनी आपले हक्काचे घर विकून मुंबई सोडून जाऊ नये, असे आवाहन केले आहे. या घरांसाठी अनेकांनी आंदोलने केली आहेत . या चाळीतील काही नागरिक आजचा क्षण बघायला हयात देखील नसतील. असंही मुख्यमंत्र्यांनी यांनी नमूद केलं आहे. ते गोरेगावमधील सिद्धार्थनगर पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित घरांच्या बांधकामा शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.
म्हाडाच्या सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ सोहळा – LIVE https://t.co/STEriaFpQQ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 22, 2022
उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईत आपले हक्काचे घर असावे असं प्रत्येकाला वाटतं. या स्वप्नाला आज सुरुवात होतेय, आज भूमिपूजन होतंय. लवकरच आपल्याला घरं देखील मिळतील. मात्र, अशी हक्काची घरं महापालिका किंवा सरकारच्या वतीने देत असतो तेव्हा माझी नेहमी एक अट असते की घर मिळवायला तुम्ही जो संघर्ष केलाय तो लक्षात ठेवा. हा संघर्ष कदापि विसरू नका, आणि मुंबई सोडून जाऊ नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी या प्रसंगी केले.