उद्धव ठाकरे यांनी कंगना, पाटकर, चितळे, राणा यांची आधी माफी मागावी

मुंबई : नेहमी वादग्रस्त विधान करणारे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काॅँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. संत्तारांच्या या विधाना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून सत्तारांनी माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा त्यांना देण्यात आला आहे. मात्र, सत्तारांच्या टीकेनंतर भापजकडून आ. अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्टिट मध्ये म्हटलं आहे की, कोणीही महिलांबाबत अपशब्द वापरणाऱ्यांचा निषेध व्हायला हवा, परंतु संजय राऊतांना, किशोरी पेडणेकरांना असे शब्द वापरण्याची सुट दिली होती का, तमाम निषेच गँगने ???, अशी विचारणा करत, दुसऱ्या एका ट्विटमध्ये, उद्धव ठाकरे यांनी कंगना, स्वप्ना पाटकर, केतकी चितळे, नवनीत राणा यांची आधी माफी मागावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

 

दरम्यान, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आता आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मी महिलांचा नेहमीच सन्मान करतो. मी महिलांबाबत एकही शब्द बोललेलो नाही. मी बोलल्यामुळे महिला भगिनींची मनं दुखली असतील तर, मी जरूर खेद व्यक्त करेन. परंतु मी असे काहीही बोललेलो नाही, असे सत्तार म्हणाले आहेत.

Share