पुन्हा उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील – जयंत पाटील

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या निलंबनाबाबत पाच सदस्यांचे खंडपीठ नियुक्त करण्याचे आदेश दिले आहे. त्यात व्हीप झुगारणारे आमदार अपात्र ठरतील. त्यामुळे राज्यपालांना पुन्हा उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करावे लागेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादीचे काॅंग्रेसचे प्रदेशाध्य जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांनी पक्षाचा व्हीप झुगारून मतदान केलेले आहे. त्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये होईल. त्यासाठी खंडपीठाची नेमणूक हीच सर्वोच्च न्यायालयाची कृती अतिशय गंभीर आहे. विधीमंडळात जे काम झाले आहे, ते सर्वोच्च न्यायालयाने अतिशय गांभीर्याने घेतले आहे, हा त्याचा संदेश असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.

याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींची नियुक्ती झाल्यावर या खंडपीठाचे कामकाज सुरु होईल. त्यातून या सगळ्याचा उलगडा होईल. त्याला काही काळ लागेल, मात्र देर है अंधेर नही है. असे जे म्हणतात ते सर्व यामध्ये घडेल. हा निकाल लागल्यावर पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येईल, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

Share