All the best : UGC NET Exam

 विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता चाचणी UGC NET परीक्षा 2023 साठी फक्त एक दिवस बाकी आहे. अशातच विद्यार्थ्यांनसाठी UGC NET परीक्षा 2023 परीक्षा केंद्र प्रसिद्ध करण्यात आले असून जेणेकरून उमेदवारांना परीक्षेच्या शहराबद्दल माहिती मिळू शकेल. कित्येक दिवसांपासून उमेदवार प्रवेशपत्राच्या प्रतीक्षेत आहेत जे आता संपले आहे. ही परीक्षा 06 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2023 या कालावधीत होणार आहे.प्रवेशपत्रे आता अधिकृत वेबसाइट https://ugcnet.nta.ac.in/ वर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. उमेदवार पोर्टलला भेट देऊन आणि आवश्यक तपशील प्रविष्ट करून ते डाउनलोड करू शकतात.
या परीक्षेची तारीख, पेपरची वेळ, रोल नंबर, रिपोर्टिंगची वेळ, परीक्षा केंद्र तपशील इत्यादींची माहिती UGC NET प्रवेश पत्रामध्ये दिली जाईल. त्यानुसार उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागेल.
UGC NET डिसेंबर सत्र प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्व उमेदवारांना प्रथम अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या UGC NET December Admit Card लिंकवर क्लिक करा. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. येथे विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करा. यानंतर अॅडमिट कार्ड तुमच्या समोर उघडेल आणि तुमच्या स्क्रीनवर दिसेल. आता तुम्ही त्याची प्रिंटआउट घेऊ शकता.
Share