वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपालांची सावरासावर

जळगावः  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोन दिवसाआधी समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्या वरून राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे येथे आंदोलनही केले होते.  वादग्रस्त वक्तव्याचा राज्यपाल  कोश्यारी यांनी जळगाव दौऱ्यावर आसतांना सावरासावर केली.

राज्यपाल कोश्यारी हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. राज्यपालांनी जैन उद्योग समूहाला भेट देण्यासह उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जलतरण तलावाचे शुभारंभ केले. त्यावेळी पत्रकारांशी बोलतांना राज्यपाल कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्याची सावरासावर केली.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे प्रेरणा स्थान आहेत. समर्थ रामदास हे शिवाजी महाराज यांचे गुरू असल्याची प्राथमिक शिक्षण घेताना मला माहिती मिळाली होती.  मात्र आता काही नवीन तथ्य मला सांगण्यात आले आहे. आता तेच पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करू, असे राज्यपाल म्हणाले.

राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांचे वादग्रस्त वक्तव्य

 

 

Share