मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फेऱ्या सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. आज सकाळी खा. संजय राऊत यांनी किरीय सोमय्यांवर निशाणा साधत, मी पुन्हा सांगतो ‘बाप बेटे जेलमध्ये जाणार’ असं राऊत यांनी ट्विट केलं आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “माझे शब्द अधोरेखित करा…. मी पुन्हा सांगतो ‘बाप बेटे जेल जाऐंगे’ आणि बाप-बेटा यांच्या व्यतिरिक्त तीन केंद्रीय तपास यंत्रणेंचे अधिकारी आणि त्यांचे वसुली एजंट देखील तुरुंगात जातील”.
Mark my words…
I repeat :
"Bap Beta jail jayenge". Period.And rest assured, apart from Baap & Beta, 3 Central agency officials and their "Vasuli Agents" will also go behind bars.
Maharashtra Jhukega nahi ! pic.twitter.com/4SCyOY4Pna
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 2, 2022
इतकेच नाही तर संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये शेवटची ओळ ही पुष्पा सिनेमातील डायलॉगचा संदर्भ घेत लिहिली आहे. “महाराष्ट्र झुकेगा नहीं” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांचे नेमके आरोप काय?
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. “ईडीवाले सुनो. सीबीआयवाले सुनो. सगळ्यांनी ऐका जरा माझं. हा जो किरीट सोमय्या आहे, हा एक फ्रॉड आहे. त्यांनं बँक घोटाळा केलाय. लोकांचे पैसे बुडवलेत. तर मी विचारतो की, निकॉन इन्फ्रा कंन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची? तर किरीटची. नील सोमय्याची. आणि हा राकेश वाधवानचा पार्टनर आहे. मौजे गोखिवरे वसईत यानं तिथं एक प्रोजेक्ट केलाय. वाधवानला यांनीच ब्लॅकमेल केलं. आणि त्याला लुबाडलं. आपल्या फ्रंटमॅनच्या नावे व्यवहार केले. कॅशही घेतली. १०० कोटी घेतले. लधानीच्या नावावर त्यांनी जमिनी घेतल्या. ४०० कोटी रुपयांची जमीन फक्त ४.४ कोटी रुपयांनी केली. अशा वेगवेगळ्या जमिनी घेतल्या. या कंपनीचा डायरेक्ट आहे नील किरीट सोमय्या. निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभारले जात आहेत. पर्यावरणाच्या परवानग्या नाही, हरित लवादानं एक्शन घेतली तर त्यावर कारवाई होईल. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना माझं आवाहन आहे, याची ताबडतोब चौकशी करुन निल सोमय्याला अटक करा”, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.