केंद्रीय मंत्री नारायण राणे राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवास्थानी भेट घेतली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर भाजप नेत्यामध्ये आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सातत्याने भेटीगाठी होत आहेत. त्यामुळे या  भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच कोकण दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या घरी सदिच्छा भेट दिली होती. पण त्यावेळी नारायण राणे घरी नव्हते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे आज केंद्रीय मंत्री नारायण यांनी राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळांत चर्चांना उधाण आलं. नारायण राणे सपत्नीक भेट घेतल्याची माहिती समजत आहे.

Share