UP Assembly Election 2022: काँग्रेसची पहिली यादी जाहीर

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीसाठी काॅंग्रेसची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत एकुण १२५ उमेदवारांचा समावेश आहे. काॅग्रेसची सरचिटणीस प्रिंयका गांधी यांनी ही यादी जाहीर केली आहे. यादीत एकूण ४० टक्के महिला उमेदवरांचा समावेश आहे.

प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आण्ही १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत आहोत यामध्ये ५० महिला उमेदवारांचा समावेश आहे. संपूर्ण राज्यात संघर्ष करणारे आणि नव्या राजकारणाची सुरुवात करणारे उमेदवार असावे असा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही उत्तरप्रदेशाच्या राजकारणाला नवी दिशा देऊ शकू असा आमचा प्रयत्न आहे.

उत्तर प्रदेशच्या ४०३ जागांच्या विधानसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये १०, १४ , २०, २३ , २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि सात मार्चला मतदान होणार आहे. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. करोनामुळे निवडणुकीसाठी नवीन प्रोटोकॉल करण्यात आला आहे. कोविडमुळे मतदानाची वेळ एक तासाने वाढली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.

Share