औरंगाबादेत पाच ठिकाणी व्हर्टिकल गार्डन तयार केले जाणार आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ही कामे केली जाणार असून त्यासाठी इलेक्ट्रिक कार ही खरेदी केल्या गेल्या आहेत.शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी ही उद्यान शहरात उभारली जाणार आहेत. त्यासोबतच उद्यात आणि चौकात कारंजे सुरू केले जाणार आहेत. करांजामुळे हवेतील धुळीचे कण कमी होऊन प्रदूषणात घट होते. या कामासाठी १५ व्या वित्त आयोगातून साडेपाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत अस महानगरपालिका प्रशासक आस्तिककुमार पांडे यांनी सांगितलय.
शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने सात इलेक्ट्रिक कार खरेदी केल्या जाणार आहेत. सिद्धार्थ उद्यानाशेजारी व्हर्टिकल गार्डन तयार करण्यात आले आहे. त्यासोबतच महावीर चौक उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजू , कर्णपुराकडील रस्त्याच्या दोन्ही बाजू, औरंगपुरा भाजीमंडई, सिडकोतील वसंतराव नाईक उड्डाणपुलाखाली ही व्हर्टिकल गार्डन तयार केल जाणार आहे. या उद्यानाच काम उद्यान अधीक्षक विजय पाटील पाहत आहेत.