वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्यावर मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई- राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड , वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे येथील एका कार्यक्रमात हातात तलवार घेत शक्ती प्रदर्शन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सदरील घटनेचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बे पोलीस आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे येथे इम्रान प्रतापगढी यांच्या स्वागतासाठी कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी या नेत्यांनी हातात तलवारी घेतल्या होत्या. वर्षा गायकवाड, अस्लम शेख आणि इम्रान प्रतापगढी यांनी हातात तलवार घेतल्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.पोलिस याचा पुढील तापस करत आहेत.

Share