कोल्हेंच्या नथुराम भूमिकेला आमचा विरोध नाही-राष्ट्रवादी

मुंबईः राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी ‘मैंने गांधी को क्यों मारा’ या चित्रपटात नथुराम गोडसेंची भूमिका साकारली आहे. यावरून राजकीय वर्तुळात अमोल कोल्हे विषय चर्चा रंगल्या आहेत. अमोल कोल्हे यांच्यावर सकारात्मक आणि नकारात्म प्रतिक्रीया येत आहेत. आशातच आता राष्ट्रवादीचे चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी हा संविधानाचा सन्मान करणारा पक्ष आहे. या संविधानाने दिलेले अधिकार प्रत्येकाला आहेत आणि कर्तव्यही प्रत्येकासाठीच आहेत. त्यानुसार अमोल कोल्हे कलाकार म्हणून नथुराम गोडसेची भूमिका साकारत असतील तर त्याला आमचा विरोध नाही असे एका वृत्तवाहिणीशी बोलताना बाबासाहेब पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे.

अमोल कोल्हे यांची कलेशी बांधिलकी आहे. त्यानुसार ते ही भूमिका साकारत आहेत. परंतु त्यांची वैचारिक बांधिलकी ही राष्ट्रवादी पक्षाच्या वैचारिक भूमिकेशीच आहे, याबाबत आमच्या मनात कोणताही संदेह नाही. शरद पोंक्षे नथुराम गोडसेची भूमिका त्या विचारांच्या प्रचारासाठी साकारतात तर अमोल कोल्हे कलाकार म्हणून कलेशी असलेल्या बांधिलकीतून ही भूमिका साकारताहेत, हा त्यातील मुलभूत फरक आहे. त्यामुळे त्यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारण्याला आमचा  कसलाही विरोध नाही’, असे बाबासाहेब पाटील म्हणाले.

Share