“अमोल कोल्हेंचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही”- नाना पटोले

मुंबई-  राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी साकारलेली नथुराम गोडसे यांची भूमिका वादात सापडली आहे.  ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाचा टिझर नूकतच प्रदर्शित झाला आहे. या टिझरमुळेचं काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक पवित्रा उचलला आहे. पटोले म्हणाले की, हा चित्रपट राज्यात प्रदर्शित होवू देणार नाही. तसेच कोल्हे हे लोकप्रितिनिधी असल्याने त्यांनी गोडसेंना हिरो बनवण्याचं काम करु नये आणि या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात लक्ष घालावं असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

नाना पटोले काय बोले-

अमोल कोल्हे  राष्ट्रवादीचे खासदार आहेत हे विसरून चालणार नाही . विशेष करुन गोडसेच्या विचाराला ताकद मिळणं म्हणजे देशविघात व्यवस्थेला ताकद मिळण्यासारखं आहे. अशा प्रवृत्तीला समाजामध्ये हिरो बनवण्याचा प्रयत्न करू नका. या देशाला फक्त महात्मा गांधींचाचा विचार तारु शकतो. त्याच विचारांनी हा देश जागतिक महासत्ता होऊ शकतो हे सातत्याने सिद्ध झालेलं आहे , असं नाना पटोलेंनी या चित्रपटाला विरोध करताना म्हटलं आहे.

 

गोडसे प्रवृत्तीने देश तुटेल. म्हणूनच अशा विघातक विचाराला हिरो बनवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो, असंही नाना पटोले म्हणाले. त्याच प्रमाणे हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही नसल्याच त्यांनी यावेळी सांगितलंआहे.

 

 

Share