Weight Loss: पोट आणि कमेरची चरबी कमी करण्यासाठी खास घरगुती उपाय

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला तंदुरुस्त राहायचे असते. पण वेळेअभावी वर्कआऊट करायला वेळ मिळत नाही, अशा स्थितीत तंदुरुस्त राहायचे आणि वजन कसे कमी करायचे याची चिंता सर्वांना सतावत आहे. तुमच्या या समस्येवर आम्ही एक उपाय आणला आहे. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की काही गोष्टी खाऊन तुम्ही तुमच्या पोटाची चरबी कमी करू शकता.

अननसाचा रस
अननस खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अननसामुळे आपल्या चयापचयला गती मिळते. त्यामुळे पोटाची चरबी लवकर कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे अननसाचा रस आपण घरी देखील तयार करू शकतो. मात्र, नेहमीच एक गोष्ट लक्षात ठेवा की, कोणत्याही फळामध्ये नैसर्गिक साखर मोठ्या प्रमाणात असतेच. यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्यांनी या रसांमध्ये साखर अजिबात टाकू नये.

संत्र्याचा रस 
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते आणि कॅलरीजचे प्रमाणही अत्यंत कमी असते. संत्र्याचा रस प्यायल्याने तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत होते. हा रस तुम्ही घरी सहज बनवू शकता. संत्रा सोलून ब्लेंडरमध्ये टाका. रस गाळून घ्या. त्यात लिंबाचा रस घाला. त्यात थोडे काळे मीठ टाकून त्याचे सेवन करा. मात्र, शक्यतो संत्र्याचा रसाचे दुपारीच सेवन करावे. रात्री सेवन करणे टाळाच.

काकडीचा रस
हंगाम कुठल्याही असो, काकडीचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. काकडीत ९० टक्के पाणी असते. त्यात भरपूर पोषक असतात. यामुळे शरीर थंड राहते. काकडीचा रस प्यायल्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. अशा प्रकारे तुम्ही जास्त खाण्यापासून स्वतःला वाचवू शकता. विशेष म्हणजे जर तुम्हाला काकडीचा रस तयार करण्यासाठी वेळ नसेल तर वजन कमी करण्यासाठी आपण काकडीचे काप करूनही काकडीचे सेवन करू शकता.

कलिंगडचा रस
कलिंगड खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कलिंगडमध्ये ९० टक्के पाणी असते. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तर कलिंगडचे जास्तीत-जास्त सेवन करायला हवे. आपण कलिंगडचा रसामध्ये लिंबू मिक्स करून पिऊ शकता. तसेच कलिंगडचा रसामध्ये साखर टाकण्याची अजिबात आवश्यक्ता नाहीये. कारण अगोदर कलिंगड गोड असते. मात्र, कलिंगडच्या रसामध्ये लिंबू मिक्स करा. कारण लिंबामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Share