Cryptocurrency In India : देश आणि जगातील कोणतीही व्यक्ती, संस्था आणि देश यांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि परस्पर व्यवहारांना चालना देण्यासाठी चलन (करन्सी) आवश्यक आहे जेणेकरून त्यांना त्याचा वापर सुरळीतपणे करता येईल. म्हणून प्रत्येक देशाचे स्वतःचे चलन आहे, जसे की भारतातील रुपया, अमेरिकेतील डॉलर इ. वास्तविक, हे भौतिक चलन आहे जे तुम्ही कोणत्याही ठिकाणी किंवा देशाच्या नियमांनुसार पाहू शकता, स्पर्श करू शकता आणि वापरू शकता. परंतु क्रिप्टो चलन त्याहून वेगळे आहे जे डिजिटल चलन आहे. तुम्ही ते पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही, कारण क्रिप्टो चलन भौतिक स्वरूपात छापलेले नाही. म्हणूनच त्याला आभासी चलन म्हणतात. गेल्या काही वर्षांपासून अगदी झटपट श्रीमंत बनवणाऱ्या जगभरात क्रिप्टोकरन्सी म्हणजेच व्हर्च्युअल चलनाबाबत आणि क्रिप्टो मार्केट्सबद्दल भारतासह जगभरात चर्चा आहे.
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?
क्रिप्टोकरन्सी हे डीजिटल चलन आहे. जे संगणकाच्या अल्गोरिदमवर तयार केले जाते. हे मालक नसलेले एक विनामूल्य चलन आहे. हे चलन कोणत्याही एका प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली नाही. हे भारताच्या रुपयाप्रमाणे, अमेरीकेच्या डॉलरप्रमाणे, युरोपच्या युरोप्रमाणे, किंवा इतर चलनांप्रमाणे हे चलन कोणत्याही राज्य, देश , संस्था किवां सरकारद्वारे चालवले जात नाही. हे एक डीजीटल चलन आहे. साधारणपणे कोणत्याही वस्तू खरेदी कतरण्या साठी यांचा वापर केला जातो.
क्रिप्टोकरन्सी कधी सुरू झाली?
क्रिप्टोकरन्सीची सुरुवात २००९ मध्ये झाली. बिटकॉइन ही जगातील सर्वांत मोठी क्रिप्टोकरन्सी असून तिच्यामुळेच क्रिप्टोकरन्सी जगाला माहित झाली. जपानमधील सतोशी नाकामोटो नावाच्या इंजिनीअरने बिटकॉइनची निर्मिती केली. जगभरात १००० हून अधिक क्रिप्टोकरन्सीज आहेत.
क्रिप्टोकरन्सीचे प्रकार कोणते ?
क्रिप्टोकरन्सी हे अनेक प्रकारचे असतात. त्यामध्ये बिटकॉईन, एथेरियम, लाईटकॉइन, रिप्पल, टिथर, डॉगकॉइन असे आणि यांसारखे दोन हजारांहून ही अधिक क्रिप्टोकरन्सी जगभरात उपलब्ध आहेत. परंतु या सर्व क्रिप्टोकरन्सीमध्ये सर्वात लोकप्रिय झालेली करन्सी म्हणजे बिटकॉईन.
बिटकॉईन – हे जगभारातील सर्वात प्रसिद्ध आणि मौल्यवलान क्रिप्टोकरन्सी आहे. हे जपानच्या इंजिनिअर सातोशी नाकामोटो यांनी २००९ मध्ये तयार केला आहे. सुरूवातीली ही सर्वात लोकप्रिय नव्हती नंतर हळूहळी याची किमंत वाढत गेली. आज बिटकॉईनचि किमंत ३६ लाख रुपये च्या घरात आहे ति कमी जास्त होत राहते.
क्रिप्टोकरन्सी कसे काम करते?
क्रिप्टोकरन्सीची उलाढाल ब्लॉक चेन तंत्रज्ञानाद्वारे चालते. या तंत्रज्ञानाच्या आधारे यातील व्यवहारांची नोंद ठेवली जाते. क्रिप्टोकरन्सीचं मायनिंगही याच ब्लॉक चेन तंत्रज्ञानाद्वारे होते. हे व्यवहार करणाऱ्यांना मायनर्स म्हणतात. अत्यंत अत्याधुनिक संगणक यावर देखरेख ठेवतात. त्यामुळे ही करन्सी हॅक करणं कठीण असतं. ब्लॉक चेनमुळे, क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार अत्यंत विश्वासार्ह असतात. त्यावर बँक किंवा कोणतीही वित्तीय संस्था अशा तिसऱ्या घटकाच्या देखरेखीची आवश्यकता नसते. क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग म्हणजे त्याची खरेदी-विक्री क्रिप्टो एक्स्चेंजवर होते. बिनान्स, कॉईनबेस, वजीरएक्स, कॉईनवन, क्रिप्टो डॉट कॉम असे अनेक क्रिप्टो एक्स्चेंज आहेत.
भारतात क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर मान्यता मिळणार?
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागू करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सरकारने कर लागू करून क्रिप्टोकरन्सीला अप्रत्यक्षपणे मान्यता दिली आहे का, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहे.
- सरकारने केवळ क्रिप्टोकरन्सी व्यवहारातून झालेल्या नफ्यावर कर लावला आहे आणि त्याला कायदेशीर मान्यता देणे अथवा त्याच्या नियमनाबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- क्रिप्टोकरन्सीचे नियमन आणि अधिकृत डिजिटल चलन याबाबत सरकार कायदा तयार करणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच केंद्रीय अर्थसंकल्पात ३० टक्के कर लावण्याची घोषणा करण्यात आली.
अर्थ सचिवांनी मांडली भूमिका
केंद्रीय अर्थसचिव टी. व्ही. सोमनाथम म्हणाले की, बिटकॉईन, इथेरियम किंवा एनएफटी यांना कधीही अधिकृत चलनाचा दर्जा मिळणार नाही. दोन लोकांमधील क्रिप्टोच्या व्यवहारांना क्रिप्टोकरन्सी असेट्स समजले जाईल. तुम्ही सोनं, हिरे किंवा क्रिप्टोची खरेदी करा पण त्याला केंद्र सरकार अधिकृत चलनाची परवानगी देणार नाही. क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक ही लाभदायक असेल याची खात्री देता येणार नाही असंही अर्थ सचिवांनी स्पष्ट केलं. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर जर नुकसान झालं तर त्याला सरकार जबाबदार नसेल असंही ते म्हणाले.
रिझर्व्ह बँकेची भूमिका
रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आभासी चलनाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आभासी चलन हे मॅक्रो इकॉनॉमिक आणि आर्थिक स्थिरतेसाठी धोका असल्याचे शक्तिकांत दास यांनी म्हटले. रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण जाहीर केले. त्यावेळी गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी विविध मुद्यावर भूमिका स्पष्ट केली. शक्तिकांत दास म्हणाले की, क्रिप्टोमुळे आर्थिक स्थिरतेशी मुद्द्यांशी सामना करण्याची आरबीआयची क्षमता कमी होईल. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात आभासी चलनाच्या नफ्यावर कर लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर एका आठवड्यानंतर दास यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
क्रिप्टोकरन्सीचे फायदे
- क्रिप्टोकरन्सी हे एक डिजिटल चलन आहे. यामध्ये फसवणूकीला पूर्णपणे जागा नाही. म्हणजेच, ते हॅक करणे अशक्य आहे.
- यात परतावा खूप चांगला मिळत असल्याने गुंतवणूकीसाठी हे चांगलं आहे. यासाठी बँकेची गरज नाही.
- क्रिप्टोमध्ये खरेदी, विक्री आणि गुंतवणूक करणं खूप सोपं आहे. याचे अनेक क्रिप्टोकरन्सी वॉलेट्स आहेत.
- क्रिप्टो करन्सी वॉलेट उपलब्ध आहेत, त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग, पैशांचे व्यवहार सोपे झाले आहेत.
- कोणतेही प्राधिकरण क्रिप्टो चलनावर नियंत्रण ठेवत नाही, ज्यामुळे नोटाबंदी आणि चलन अवमूल्यन यांसारखा कोणताही धोका नाही.
- जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून कोणत्याही कोपऱ्यात याचं हस्तांतरण करता येतं. क्रिप्टोकरन्सी वॉलेट्मधून बँक खात्यात रक्कम येण्याकरता फक्त दहा मिनिटे लागतात.
- क्रिप्टो चलनाचा सर्वात मोठा फायदा अशा लोकांसाठी आहे ज्यांना त्यांचे पैसे लपवायचे आहेत. म्हणूनच क्रिप्टो चलन हे पैसे लपवण्यासाठी सर्वोत्तम व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे
क्रिप्टोकरन्सीचे तोटे
- क्रिप्टोकरन्सीजचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. सर्वांत मोठं नुकसान म्हणजे त्यासाठी कोणतेही नियम नाहीत. क्रिप्टोकरन्सी कोणत्याही राज्य किंवा सरकारद्वारे यावर नियंत्रण नसते. त्याची किंमत कधीकधी खूप वाढते आणि कधीकधी खूप कमी होते, अशा परिस्थितीत त्यात गुंतवणूक करणे धोकादायक असते.
- क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार एक कोड आणि पासवर्डद्वारे केले जातात. ते विसरल्यास, त्यात गुंतविलेली संपूर्ण रक्कम बुडते. रक्कम वसूल केली जाऊ शकत नाही.
- याचा उपयोग बेकायदेशीरपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे हस्तांतरित करण्यासाठी केला जाऊ शकतो. या कारणामुळेच अनेक देशांमध्ये क्रिप्टोवर बंदी आहे.
- क्रिप्टोकरन्सीचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्याचे कोणतेही भौतिक अस्तित्व नाही, कारण ते छापले जाऊ शकत नाही. म्हणजे या चलनाच्या नोटा छापल्या जाऊ शकत नाहीत किंवा कोणतेही बँक खाते किंवा पासबुक जारी करता येत नाही.
- शस्त्रास्त्र व्यापार, अंमली पदार्थांचा पुरवठा, काळाबाजार इत्यादी चुकीच्या कारणांसाठी सहजपणे वापरला जाऊ शकतो, कारण तो फक्त दोन लोकांमध्ये वापरला जातो. त्यामुळे, ते खूप धोकादायक देखील असू शकते.
- हॅक होण्याचा धोकाही असतो. ही वस्तुस्थिती आहे की ब्लॉकचेन हॅक करणे तितके सोपे नाही कारण त्यात संपूर्ण सुरक्षा व्यवस्था आहे. असे असतानाही या चलनाचा कोणीही मालक नसल्याने हॅकिंगची शक्यता नाकारता येत नाही.