काय ते मंत्री? काय त्यांचे नाव? काय त्यांचा दौरा? एकदम OK; मिटकरींनी सावंतांना डिवचले

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत या ना त्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. पावसाळी अधिवेशनामध्ये डासांच्या प्रश्नावर गोंधळलेले तानाजी सावंत आता आपल्या धावत्या दौऱ्यावरून चांगलेच ट्रोल झाले आहे. सावंत यांच्या पुणे दौऱ्यात तीन दिवस घर ते खाजगी कार्यालयाला जाण्याची माहिती दिल्याने चांगलेच ट्रोल झाले. याच दरम्यान आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर बोचरी टिका केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं की, ”हे आहेत आमचे आरोग्य मंत्री! एकट्या पुणे शहरात एकाच दिवसात हजारो किलोमीटरचा दौरा करण्याचा नवा विक्रम!! ” काय ते मंत्री ? काय त्यांचे नाव? आणि काय त्यांचा दौरा?? एकदम OKK OKK” असे म्हणत त्यांनी सावंत यांना डिवचले आहे.

दरम्यान, मंत्र्यांचा दौरा जाहीर झाला की त्यांचा विविध ठिकाणचा आढावा असतो. काही बैठका असतात महत्वाच्या व्यक्तींच्या भेटी गाठी असतात. पत्रकार परिषदा, किंवा सभा असतात. नवनिर्वाचीत आरोग्य मंत्री असलेल्या तानाजी सावंतांच्या दौऱ्यात कोणत्याही बैठका, सभा किंवा पत्रकार परिषद नसल्याने आणि या प्रवासादरम्यान पोलीसांचा कॉनव्हॉय तैनात असल्याने या दौऱ्यावरु त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.

Share